पुणे : पुण्यातील जनता वसाहत परिसरातील चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार जनता वसाहत परिसरात फेब्रुवारी 2024 ते 14 मार्च 2024 या कालावधीत वारंवार घडला आहे.
याप्रकरणी पर्वती पोलिसांनी 21 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 21 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी हा फिर्य़ादी राहात असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून घरात कोणी नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
मात्र लग्नाची विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली. हा प्रकार फिर्यादी यांना समजल्यानंतर त्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.