इंदापूर (पुणे): इंदापूर तालुक्यातील अथुर्णे गावात एका २२ वर्षीय तरुणाची त्याच्या नातेवाईकाने इंस्टाग्राम मेसेजवरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आकाश मुसा चौगुले असे मृताचे नाव असून, इन्स्टाग्रामवर पाठवलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आकाशचा नातेवाईक राजेश पवारसोबत वाद झाला होता. आकाश आणि राजेश यांच्यातील वाद विकोपाला गेला होता, ज्यामुळे राजेशने आकाशचा गळा दाबून खून केला आणि बेशुद्ध होई पर्यंत आकाशचे डोके दगडावर आपटले, दरम्यान, घटनेनंतर आकाशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर आरोपीने पळ काढला आणि जंगलात जाऊन बसला. वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या 5 तासात आरोपीला शोधत त्याला अटक केली आहे. आरोपी जवळच्या जंगलात लपून बसला होता, परंतु वालचंदनगर पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.