बापू मुळीक
सासवड : सासवड शिवतीर्थ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सकल मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा परिवार यांच्या संयुक्त विद्यामानाने १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. सद्या महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. रक्ताला जात नसते सर्वांचे रक्त एकच असते याची प्रचिती आज सासवड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आली.
पुरंदर मधील सर्व समाजातील बांधवानी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांची व तरुणीची संख्या लक्षणीय होती. या शिबिराचे महत्त्व म्हणजे ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले. त्यांना महाराष्ट्रात कुठेही रक्ताची गरज भासली तर त्वरित रक्ताचा पुरवठा होईल, असे पुरंदर ब्लड बँक सासवड, अक्षय ब्लड बँक हडपसरच्या संचालकांनी सांगितले.
याप्रसंगी उद्योजक अनिल बापू जगताप, नंदू जगताप, अभिजीत जगताप, हर्षवर्धन पायगुडे, स्वप्निल गायकवाड, महेश सणस, अमोल कड, आकाश शेळके, योगेश कोलते, संदीप राऊत, राहुल कामठे, रामदास बोरकर, भालचंद्र जाधव, संतोष जगताप, पांडुरंग जगताप, सचिन मोकाशी, निखिल सावंत, संदिप कामथे, स्विकार निगडे, प्रभाकर आढेकर, गणेश बोरकर, शुभम कामथे उपस्थित होते.