पुणे: वडमुखवाडी येथे जुन्या भांडणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी (दि. 11 मे) ला रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली. सोहम सचिन शिंदे (वय 17 वर्ष, माऊली नगर कॉलनी क्रमांक 1, दिघी) असे खून झालेल्या अल्पवयीन तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोहमचे वडील सचिन प्रल्हाद शिंदे (वय 46 वर्ष) यांनी दिघी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.
दरम्यान, तपासात सुरुवातीला याप्रकरणात 3 जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आता त्यानंतर आणखी दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणाचा छडा लावत पोलिसांकडून नामदेव ऊर्फ नीलेश सोमनाथ शिंदे (वय 25 वर्ष, दिघी), शुभम पंढरीनाथ पोखरकर (वय 22 वर्ष, रा.दिघी),सुमित ज्ञानेश्वर शिंदे (वय 28 वर्ष, रा.दिघी),ओंकार मिलिंद पाटोळे (वय 23 वर्ष, रा.आळंदी),ओंकार सुभाष हिवराळे (वय 21 वर्ष, रा. चऱ्होली) यांना अटक करण्यात आली आहे.