पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच सर्व ठिकाणचे फलक काढण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. तीन दिवसांमध्ये बॅनर काढले नाही तर आम्ही कारवाई करू, असा इशाराच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला होता.
त्या आदेशाचे पालन करत स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील ११ हजार ८३, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १९ हजार ६५२ आणि खाजगी जागेवरील १ हजार ८१५ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले कि, आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पडावी. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३२ हजाराहून अधिक बॅनर हटवले
मावळ लोकसभा मतदारसंघ
शासकीय जागेतील ९६१
सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे २५५२
खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २०७
पुणे लोकसभा मतदारसंघ
शासकीय जागेतील ७८५
सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १४३१
खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २५७
बारामती लोकसभा मतदारसंघ
शासकीय जागेतील ४ हजार ४८८
सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे ५२८१
खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २३२
शिरूर लोकसभा मतदारसंघ
शासकीय जागेतील ४ हजार ८४९
सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १० हजार ३८८
खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ११९
एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.