पुणे : पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई चालक पदाची भरती बुधवारी (ता. 19) पोलीस अधीक्षक मुख्यालय मैदान चव्हाणनगर, पुणे येथे घेण्यात आली होती.
पोलीस शिपाई चालक पदासाठी शुक्रवारी (ता. 21) मैदानी चाचणीसाठी 600 उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी 321 उमेदवार हजर राहिले. तर उर्वरित 279 उमेदवार गैरहजर होते. हजर 321 उमेदवारांपैकी 289 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत. कागदपत्रे पडताळणीत 16 व शारीरीक मोजमापात 16 उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी RFID (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मूळ कागदपत्रे आणू नयेत. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति आणाव्यात. परगावातील उमेदवारांना राहण्यासाठी तात्पुरती सोय ही पोलीस मुख्यालयातील पुरंदर हॉल समोरील पेंडॉल व अन्य एक ठिकाणी केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.