लोणी काळभोर, (पुणे) : महातारीमाता ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाचे कार्य कौतुकास्पद असून या ठिकाणी अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून नागरिकांसाठी दिशादर्शक उपक्रम राबवला याचे समाधान फार वेगळे असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केले.
थेऊर (ता. हवेली) येथील महातारीमाता ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव २०२२ आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चित्रा वाघ बोलत होत्या.
थेऊरचे माजी सरपंच व प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब काकडे यांनी केले असून, सद्यस्थितीत या नवरात्रोत्सवाचे सर्व आयोजन व नियोजन प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांच्या व सहकार्यातून नवरात्र महोत्सवाचे मुख्य संयोजक नवनाथ काकडे करीत आहेत. २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत मोठ्या उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.
यावेळी दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल, पोलीस उपायुक्त राजा रामासामी, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, भाजप प्रदेश उपाध्यक्ष जालींदर कामठे, पाश्वगायक हभप ज्ञानेश्वर मेश्राम, पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त बन्सीधर देसाई, सेवानिवृत्त पोलीस उपाधिक्षक सुहास गरुड, राहुलकुमार येवले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, हवेलीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे, भाजप तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, धनकवडीचे मा. सरपंच अर्जुनभाऊ तापकीर, सरपंच एल.बी. कुंजीर, व्यवस्थापक संदिप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना वाघ म्हणाल्या, “या कार्यक्रमात दोन महिला महाराजांचे किर्तन होणार असून किर्तन व अध्यात्माच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरे हि आपोआप मिळत जातात. जगण्याची दिशा असे पारायण आपल्या येथे होत आहेत. त्याचा मला आनंद आहे.