राहुल कुमार अवचट
यवत (दौंड): खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगरपालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्याहुन अधिक पाणी वापर होत असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, त्यामुळे खडकवासला धारण ते फुरसुंगी दरम्यानचा बोगद्याद्वारे पाणी वाहून नेण्याचा प्रकल्प तातडीने हाती घ्यावा, अशी मागणी राहुल कुल यांच्यावतीने करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेद्वारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत शेतीच्या सिंचनासाठी काही अत्यावश्यक उपायोजना तातडीने करण्यात याव्यात त्यामध्ये खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यामधून पाणी नेण्याच्या प्रकल्प तातडीने हाती घेण्यात यावा, ही मागणी आमदार कुल यांनी केली आहे.
त्याबरोबरीने जुना मुठा उजवा (बेबी कॅनॉल ) , नवीन मुठा उजवा कालव्याची विस्तार, सुधारणा व अस्तरीकरणाच्या प्रस्तावित कामांना तातडीने मान्यता देऊन हि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी पुष्टी आमदार कुल यांनी जोडली.
तसेच जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, तसेच जलसिंचनामुळे चिबड, पाणथळ व क्षारयुक्त जमिनींचे प्रमाण वाढले असून चिबाड जमीन निर्मूलन कार्यक्रम साठी १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करावी अशी मागणी आमदार कुल यांनी विधानसभेमध्ये केली. आपल्या सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.