Devendra Fadnavis मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने म्हटले की ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. तर 16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. तसेच उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आणता आले असते. असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली आहे.
हे सरकार कायदेशीरच होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने अखेर विरोधकांच्या शंकेचे निरसन केले आहे. उध्दव ठाकरे हे हरले आहेत. त्यांना लोक सोडून गेले आहेत. भाजपला दगा दिला त्यावेळी त्यांची नैतिकता कुठे गेली होती. असा प्रश्न उपस्थित करत, उध्दव ठाकरे यांनी आता नैतिकतेचा मुलामा देवू नये, असे ठणकावून फडणवीस यांनी सांगितले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे
महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
– उध्दव ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही.
– निवडणुक आयोगाल पूर्ण अधिकार असल्याचे कोर्टाने सांगितले.
– कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिली
– हे सरकार पूर्णपणे कायदेशीर, विरोधकांच्या शंकेचे निरसन सुप्रीम कोर्टाने केली
– उध्दव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधार वर राजीनामा दिला असे सांगतात. ज्यावेळी भाजप सोबत निवडूण आला त्यानंतर, विरोधी पक्षासोबत गेले त्यावेळी नैतिकता कुठे गेली होती ?
– उध्दव ठाकरे यांना लोक सोडून गेले आहेत, ते हरले आहेत, त्यांनी आता नैतिकतेचा मुलामा देऊ नये.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Devendra Fadnavis :राज्य सरकार शेतकऱ्याला देणार एकरी 50 हजार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा