पाचगणी, (सातारा) : वृध्दांना मानसिक त्रासापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या समवयस्कांसबोत एकत्र येण्यासाठी आणि सामाजिक मोकळीक शोधण्यासाठी जेष्ठ नागरिकांना जागा उपलब्ध करून पाचगणी पालिकेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वर- वाई – खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी केले. (MLA Makrand Patil)
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील आंबेडकर उद्यान येथे जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ कार्यालयाचे उद्घाटन मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटील बोलत होते. (MLA Makrand Patil)
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, शिंदे गटाचे नेते प्रविण भिलारे, नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, समाजसेवक प्रकाश गोळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका समन्वयक मंगेशभाई उपाध्याय, मिलिंद कासुर्डे, जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर पुरोहित, उपाध्यक्ष जयवंत बगाडे,संस्थापक अनिल बागडे, माजी अध्यक्ष शिवलिंग घोणे, चंद्रकांत माने, सुरेश भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते. (MLA Makrand Patil)
यापुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, “जेष्ठ नागरिक संघाला निसर्गरम्य ठिकाणी चांगली जागा मिळाली असून प्रकाश गोळेसह आदी कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ज्येष्ठांचा प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी हे दालन चांगले आहे.” (MLA Makrand Patil)
दरम्यान, किशोरभाई पुरोहित म्हणाले जिल्ह्यातील एक आदर्श जेष्ठ नागरिक संघ म्हणून आम्हाला गौरविण्यात आले.हे आमचे सौभाग्य आहे. गेली बारा वर्षे आम्ही संघासाठी जागा मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या सहकार्याने आम्हाला ही जागा मिळाली आहे. यावेळी राजेंद्र राजपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश भिलारे यांनी सुत्रसंचलन केले. अनिल बागडे यांनी आभार मानले. (MLA Makrand Patil)