लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सुर्यकांत सुखदेव गवळी यांची राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या राज्यप्रमुख पदी बुधवारी (ता. १९) फेरनिवड करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नुकतेच देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार निलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी उपस्थित होते. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठीतसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांसाठी पोहोचविण्यासाठी सहकार्य कराल असे निवेदनात म्हटले आहे.
निवडीनंतर बोलताना सुर्यकांत गवळी म्हणाले, “२० जुलै २०२० रोजीपारीत झालेला ग्राहक कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत, नागरिकांपर्यत पोहोचविणे. तसेच घराघरामध्ये ग्राहक जागृती करण्याचा एक संकल्प सोडतो आहे. ग्राहकांचे हक्क, अधिकार कर्तव्य सांगून सोषणमुक्त महाराष्ट्र उभा राहावा यासाठी प्रयत्न करणार आहे.”