Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नगरमध्ये बारा तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 October 2022, 9:23
पुणे – दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे न सोडता सोलापूर मार्गे सोडण्याची घोषणा करण्यात आली. ही बाब कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून रेल्वे थेट पुण्याकडे रवाना करण्यास सांगितले. त्यानंतर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ती पुण्यात सुखरूप पोहोचली असून दौंड आणि पुण्यातील अनेक प्रवाशांनी खासदार सुळे यांचे आभार मानले आहेत.
दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस काल नगर स्टेशनमध्ये पोहोचली. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी सांगत तब्बल १२ तास ती तेथेच थांबविण्यात आली. त्यानंतरही नेहमीच्या मार्गाने न सोडता ती सोलापूर मार्गे जाईल असे अचानकच प्रवाशांना कळविण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तसे झाल्यास पुणे आणि दौंड येथे उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती.
ही बाब प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तथापि काहीही फायदा झाला नाही. त्यावेळी काही प्रवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकारी लोचन शिवले आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांच्या मार्फत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार खासदार सुळे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्याशी तत्काळ संपर्क साधून प्रवाशांच्या अडचणी सांगितल्या. त्यांना प्रवाशांची अडचण लक्षात आणून देत त्यांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यास सुचविले.
त्यानंतर अखेर रेल्वे विभागाने निजामुद्दीन एक्स्प्रेस सोलापूरकडे न वळवता नेहमीच्या मार्गाने दाैंडमार्गे पुण्याला आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गाडी आज सकाळी साडेकरच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्रीतूनच तातडीच्या सर्व प्रक्रिया पार पाडत सर्व प्रवाशांना सुखरूप दौंड आणि पुण्यात पोहोचण्यासाठी मदत केली याबद्दल सर्व प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले; आजही पाऊस पडण्याची शक्यता..?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.