Solapur news : सोलापूर : कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नुकताच शिवसेना आणि भाजपातील वाद उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांना यापुढे मदत न करण्याचा ठराव भाजपाने संमत केला आहे. या प्रकरणावरून वादाची ठिणगी पडली आहे. सोलापूर-माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख संजय कोकाटे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, त्यांनी सोलापुरातील भाजपा-शिवसेना यांचा वाद सर्वांसमोर उघड केला आहे. फेसबूकद्वारे व्हिडीओ पोस्ट करून, या मतदारसंघात फक्त भाजपाचीच कामे केली जातात, असा सणसणाटी आरोप त्यांनी केला आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (After Kalyan, now in Solapur, the dispute in the alliance is on the boil…Shinde group leader’s direct warning to BJP!)
संजय कोकाटे यांनी केला कल्याण भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेचा निषेध
संजय कोकाटे यांनी आपल्या व्हिडीओ पोस्टद्वारे, कल्याण भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेचा निषेध केला आहे. कल्याणमध्ये शिवसेनेला असहकार केल्याचा ठराव भाजपने केला आहे.(Solapur news) त्यांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाने हे लक्षात ठेवावं की एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण सत्तेत आहोत. सोलापूर जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचा अन्याय सहन केला आहे. पालकमंत्री वेळ देत नाहीत. संजय गांधी निराधारसारख्या कमिट्या पुढे झालेल्या नाहीत. आमची कोणतीही कामे होत नाहीत. फक्त भाजपाची कामे करा, असे अलिखित आदेश प्रशासनाला दिले आहेत. तेही आम्ही सहन करतो, अशा शब्दांत कोकाटे यांनी संताप व्यक्त केला.
कोकाटे पुढे म्हणाले की, माढा लोकसभेमध्ये जीवाचं रान करून २५-३० वर्षांचा अन्याय डोळ्यांसमोर ठेवून आम्ही भाजापाचा खासदार निवडून दिला. पण भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही ज्यांचा विरोध पत्करून मदत केली त्यांनाच बरोबर घेऊन त्यांना ताकद दिली जाते. (Solapur news) त्यांनाच बरोबर घेऊन उद्या कदाचित भाजपाची अतंर्गत बंडाळी मिटेल. पण शिवसेना किंवा मित्र पक्ष येणाऱ्या काळात भाजापचा प्रचार करतील असं वाटत नाही. आम्हाला काहीही अपेक्षा नाही. आमच्या पत्रालाही उत्तर दिलं जात नाही. ज्यांच्याविरोधात रक्ताचं पाणी केलं त्याच लोकांना घेऊन फिरणार असाल तर आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका.., असं संजय कोकाटे यांनी स्पष्ट केलं.
ठाण्यात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) युतीत असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. (Solapur news) अशातच आता भाजपा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे गटावर भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला आहे. तसेच एका अधिकाऱ्यामुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचं सांगत तो अधिकारी आकाशातून पडला आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur News : पन्नाशीत आजी-आजोबा पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत’
Solapur News : सोलापूरात कौटुंबिक वादाचा भयानक अंत; पत्नीची गळा कापून हत्या; अन् पतीचीही आत्महत्या