Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tuljapur News : तुळजाभवानीला सुमारे 40 कोटींच्या 354 हिर्‍यांचे दान! भाविकांनी दिलेल्या भेट वस्तूची मोजदाद सुरू…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 13:37

Tuljapur News : तुळजापूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या तुळजाभवानीला मोठ्या भक्ती भावाने तिची पूजा केली जाते. तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. भाविक मोठ्या श्रध्देने भाविक सोन्या, चांदीच्या स्वरूपात दान अर्पण करतात. 15 वर्षांपासून या मौल्यवान दानाची मोजदादच झाली नव्हती. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी देवीच्या तिजोरीतील मौल्यवान ऐवजाची मोजदाद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Donation of 354 diamonds worth about 40 crores to Tuljabhavani! Counting of gifts given by devotees continues…)

मोजणीचे काम महिनाभर चालणार

15 वर्षानंतर करण्यात येणारे  मोजदाद  महिनाभर चालणार आहे. 200 किलो सोने आणि 4000 किलो चांदीच्या दागिन्यांची मोजणी करून नंतर त्याची शुद्धता तपासण्यात येणार आहे.

दागिन्यांची मोजणी सुरू असताना शनिवारी एका सिलबंद पाकिटात तब्बल 354 हिरे दान करण्यात आल्याचे दिसून आले. हे हिरे आकाराने छोटे असून त्यांची किंमत 30 ते 40 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.(Tuljapur News )  हे दान कुणी केले याची माहिती मात्र समोर आली नाही. आतापर्यंत तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा तसेच मुंबईतील सिद्धीविनायकाला करण्यात आलेल्या दानाची नोंद आहे. मात्र तुळजाभवानीच्या दानपात्रात एवढे मोठे दान पहिल्यांदाच करण्यात आले आहे.

 

दागिन्यांची मोजदाद करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून यात नायब तहसीलदार अमित भारती, सहायक धर्मादाय आयुक्तांचे प्रतिनिधी, (Tuljapur News ) जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, देवीचे महंत तुकोजीबुवा महंत, चिलोजीबुवा, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडे यांचा समावेश आहे. सिद्धीविनायक मंदिराचे सुवर्णतज्ज्ञ प्रभाकर काळे यांच्या देखरेखीत ही मोजदाद होणार आहे.

कडेकोट बंदोबस्तात मोजदाद
दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये अत्यंत कडक बंदोबस्तात दागिन्यांचे मोजमाप करण्यात येत आहे. हॉलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून मोजदाद करणार्‍या कर्मचार्‍यांना विशेष गणवेष देण्यात आला आहे. (Tuljapur News ) या गणवेषाला एकही खिसा नाही. पहिल्या दिवशी एका पेटीची मोजणी करण्यात आली. यात 720 पाकिटे होती.

रिझर्व्ह बँक देणार वितळवून
तुळजाभवानीच्या दागिन्यांची मोजदाद झाल्यानंतर ते रिझर्व्ह बँकेच्या विशेष समितीकडे पाठवण्यात येणार आहेत. ही समिती शुद्धतेची खातरजमा करून त्यानंतर हा ऐवज वितळवून त्याच्या विटा आणि बिस्किटे बनवून मंदिर संस्थानला परत करणार आहे. (Tuljapur News )  मंदिर संस्थानने बाजारमुल्यानुसार रोकड देण्याची विनंती केल्यास तशीही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Uruli Kanchan News : हिंगणगाव – खामगाव टेक येथील जलसमाधी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती ; लोणीकंद पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यस्थीला यश..

Fraud | महिलांनो सावधान ! चॉकलेट पॅकिंगचे काम देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणारी टोळी पूर्व हवेलीत सक्रीय…!

National Highway | कात्रज, वडकी, लोणी काळभोर मार्गे थेऊर ते लोणीकंद राष्ट्रीय महामार्ग घोषित ; रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरु…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : महाराष्ट्र बनले सायबर भामट्यांचे हब ; तब्बल ९०० कोटींची लूट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.