Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur news : कल्याणनंतर आता सोलापूरमध्ये युतीतील वाद चव्हाट्यावर… शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला थेट इशारा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 13:33

Solapur news : सोलापूर  : कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नुकताच शिवसेना आणि भाजपातील वाद उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांना यापुढे मदत न करण्याचा ठराव भाजपाने संमत केला आहे. या प्रकरणावरून वादाची ठिणगी पडली आहे. सोलापूर-माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख संजय कोकाटे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, त्यांनी सोलापुरातील भाजपा-शिवसेना यांचा वाद सर्वांसमोर उघड केला आहे. फेसबूकद्वारे व्हिडीओ पोस्ट करून, या मतदारसंघात फक्त भाजपाचीच कामे केली जातात, असा सणसणाटी आरोप त्यांनी केला आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (After Kalyan, now in Solapur, the dispute in the alliance is on the boil…Shinde group leader’s direct warning to BJP!)

संजय कोकाटे यांनी केला कल्याण भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेचा निषेध

संजय कोकाटे यांनी आपल्या व्हिडीओ पोस्टद्वारे, कल्याण भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेचा निषेध केला आहे. कल्याणमध्ये शिवसेनेला असहकार केल्याचा ठराव भाजपने केला आहे.(Solapur news)  त्यांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाने हे लक्षात ठेवावं की एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण सत्तेत आहोत. सोलापूर जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचा अन्याय सहन केला आहे. पालकमंत्री वेळ देत नाहीत. संजय गांधी निराधारसारख्या कमिट्या पुढे झालेल्या नाहीत. आमची कोणतीही कामे होत नाहीत. फक्त भाजपाची कामे करा, असे अलिखित आदेश प्रशासनाला दिले आहेत. तेही आम्ही सहन करतो, अशा शब्दांत कोकाटे यांनी संताप व्यक्त केला.

कोकाटे पुढे म्हणाले की, माढा लोकसभेमध्ये जीवाचं रान करून २५-३० वर्षांचा अन्याय डोळ्यांसमोर ठेवून आम्ही भाजापाचा खासदार निवडून दिला. पण भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही ज्यांचा विरोध पत्करून मदत केली त्यांनाच बरोबर घेऊन त्यांना ताकद दिली जाते. (Solapur news) त्यांनाच बरोबर घेऊन उद्या कदाचित भाजपाची अतंर्गत बंडाळी मिटेल. पण शिवसेना किंवा मित्र पक्ष येणाऱ्या काळात भाजापचा प्रचार करतील असं वाटत नाही. आम्हाला काहीही अपेक्षा नाही. आमच्या पत्रालाही उत्तर दिलं जात नाही. ज्यांच्याविरोधात रक्ताचं पाणी केलं त्याच लोकांना घेऊन फिरणार असाल तर आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका.., असं संजय कोकाटे यांनी स्पष्ट केलं.

 

ठाण्यात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) युतीत असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. (Solapur news) अशातच आता भाजपा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे गटावर भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला आहे. तसेच एका अधिकाऱ्यामुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचं सांगत तो अधिकारी आकाशातून पडला आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Solapur News : पोलिसांचा चुकीचा पाठलागही आला कामाला; दरोडेखोर समजून केलेल्या पाठलागात दारू तस्कर लागले हाती

Solapur News : पन्नाशीत आजी-आजोबा पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत’

Solapur News : सोलापूरात कौटुंबिक वादाचा भयानक अंत; पत्नीची गळा कापून हत्या; अन् पतीचीही आत्महत्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28
Next Post

Tuljapur News : तुळजाभवानीला सुमारे 40 कोटींच्या 354 हिर्‍यांचे दान! भाविकांनी दिलेल्या भेट वस्तूची मोजदाद सुरू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.