पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने म्हटले की ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. तर 16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. तसेच उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आणता आले असते. असे सुप्रीम कोर्टाने
निरीक्षण नोंदवले आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले,
“देशामध्ये लोकशाहीची हत्या होत आहे की अशी परिस्थिती आहे. देशातील विरोधी पक्ष आणि लोकशाहीच्या बाजूने नेते एकत्र आले आहेत,. निकाल हा शिवसेनेचा नव्हे तर देशाच्या लोकशाहीसाठी महत्वाचा होता.”
ज्या पक्षाने सर्व काही दिले, त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याच समोर अविश्वास दर्शक प्रस्ताव मांडावा, असे मला वाटले नाही. त्यामुळे मी राजीनामा दिला असे उध्द ठाकरे यांनी सांगितले.
सत्तेसाठी हपापलेल्यांची चिरफाड करणारा हा निकाल
राज्यपाल ही आदरयुक्त यंत्रणा होती. मात्र त्याचे धिंदोडे काढण्यात आले. संविधान वाचवणे महत्वाचे आहे. सत्तेसाठी हापापलेल्यांची चिरफाड करणारा हा निकाल आहे. अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांवर सोपवला असला तरी हा निर्णय माझ्या शिवसेनेवरचे असेलच. विधानससभेचे अध्यक्ष निर्णय घेतीलच. असे ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाकरे म्हणतात…
– मी माझ्यासाठी लढत नाही. तर राज्यातील जनतेसाठी लढत आहे.
– देशाला आणि संविधानाला वाचवायचे आहे.
– आता विरोधी पक्ष मिळून लढा देऊ
– देशाला हे लोक गुलाम बनवू पाहत आहेत.
– एकनाथ शिंदे यांच्यात नैतिकता असेल त्यांनी राजीनामा द्यावा
– गद्दारांनी अविश्वास प्रस्ताव आणणार हे मला न पटणारे, मंजूर नव्हेत.
– राज्यपाल ही यंत्रणा आता ठेवावी का असे न्यायालयाला विचारले पाहिजे.
– अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांना ठरवायचा आहे
– माझ्याच शिवसेनेचा व्हिप लागू लागणार
– शिवसेना हे नाव आम्ही कोणाला घेवू देणार नाही
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :-
Uddhav Thakare : उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आणता आले असते ; सुप्रीम कोर्ट
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे बारसूच्या आंदोलकांनी केले स्वागत