युनूस तांबोळी
Shirur News : शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागाला बेट भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. जेष्ठ नेते शरद पवार व सहकारमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जिरायत क्षेत्राला बागायत क्षेत्रात करून नंदनवन केले. यापुढे देखिल सत्तेच्या माध्यमामधुन सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी एकदिलाने काम करू. असा विश्वास शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केला .(Shirur News)
जिरायत क्षेत्राला बागायत क्षेत्रात करून नंदनवन केले.
सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमा मधुन शिंदेवस्ती (टाकळी हाजी ता. शिरूर ) येथे संत सेना महाराज सभा मंडपाचा भुमिपुजन भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्यांचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे बोलत होते.(Shirur News)
या वेळी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, घोडगंगाचे संचालक सोपानराव भाकरे,चांदाशेठ गावडे, सखाराम खामकर,चंद्रकांत साबळे, शहाजी सोदक, देविदास पवार, अरुण हिलाल, रमेश गावडे, बंडु कांदळकर, सुनिल थोरात, बापुसाहेब होने,सुभाष गावडे, शिवाजी कांदळकर, नाभिक संघटनेचे अध्यक्ष अर्जुनराव शिंदे, सचिव दत्तात्रय शिंदे, टाकळीकर दिडी मंडळाचे अध्यक्ष अशोक शिंदे, गणेश शिंदे, गंगाराम शिंदे देवराम शिंदे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.(Shirur News)
यावेळी भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, या भागातील जनतेला वंचीत ठेऊन पाणी पळविण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्यासाठी रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल. घोड कुकडी मिना नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची तरतुद व्हायला हवी.(Shirur News)
डिंभा धरणातुन बोगदा काढुन हक्काचे पाणी पळविण्याचा प्रयत्न सध्या सुरु असुन त्यामुळे आंबेगाव जुन्नर शिरूर पारनेर तालुक्यातील बागायती क्षेत्राचे वाळवंट होऊन दुष्काळाचे संकट निर्माण होईल . या निर्णयाला सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी प्रखर विरोध केला असुन आपणही एकदिलाने पक्ष भेद विसरून त्यांच्या पाठीमागे उभे राहावा असे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे.(Shirur News)
दरम्यान, दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमा मधुन टाकळी हाजी – जांबुत रस्ता – ५.५ कोटी तर माळवाडी टाकळी हाजी रस्ता – ४ कोटी रुपये मंजुर झाले असल्यांची माहीती माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिली. जांबुत टाकळी हाजी रस्ता रुंद करण्यात येणार असुन त्यांचा फायदा परीसरातील जनतेला होणार आहे.