अक्षय भोरडे
Shirur News तळेगाव ढमढेरे, ता.३० : घोडनदी बार असोसिएशनच्या सदस्यपदी तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ॲड. जयवंत बाबुराव शिलवंत यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Shirur News)
शिरूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील एका कार्यालयात घोडनदी बार असोसिएशनची बैठक शनिवारी (ता.२९) पार पडली. या बैठकीत २०२३-२०२४ या वर्षांकरिता सदस्यांच्या बिनविरोध नेमणुका करण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड विरेंद्र सावंत व ॲड सुहास ढमढेरे यांनी ॲड. जयवंत शिलवंत यांची सदस्यपदी बिनविरोध निवड केली. (Shirur News)
यावेळी ॲड अतुल ताजणे, ॲड. भाग्यश्री बोरा, ॲड संदीप शिंदे, ॲड. रोहित पोटावळे, ॲड. सागर नेटके, ॲड. प्रज्ञा पवार, ॲड. वैशाली गायकवाड, ॲड. महेश कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते
दरम्यान, ॲड. जयवंत शिलवंत यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या आई वडिलांनी अथक कष्ट केले. त्याच कष्टाची जाणीव ठेवून ॲड शिलवंत यांनी पुणे येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. आणि नुकत्याच पार पडलेल्या घोडनदी बार असोसिएशनच्या निवड प्रक्रियेत कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ॲड. जयवंत शिलवंत यांच्या या निवडीबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. (Shirur News)