पुणे : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील मोदीबागमध्ये माध्यमांशी बोलताना सगळ्यांची विचारधारा एक आहे, शिंदेसोबत जे गेले ते आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे असं वक्तव्य केलं आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे
दरम्यान जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यावर समसमान जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र आता अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असं शरद पवार म्हणाले आहेत त्यामुळे लेकीसाठी फिल्डिंग लावताना जयंत पाटलांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आहे.