Sharad Pawar पुणे : महाराष्ट्राच्या राजकाराणात मोठी उलथा पालथ होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवर भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तसेच राष्ट्रावादीच्या आमदारांनी काही वक्तव्ये केल्याने ते नक्कीच भाजपमध्ये जातील की काय असा प्रश्न राज्याला पडला आहे. अजि पवारांच्या या बातम्यांवर शरद पवार Sharad Pawar काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. त्यांनी अखेर यावर स्पष्टीकरण दिले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप यांच्या जवळीच्या चर्चा केवळ तुमच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्व नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय चर्चांवर भाष्य केले आहे.
ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती मान्य असल्याचं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते.
शरद पवार म्हणाले…!
“अजित पवारांबाबत जी चर्चा सुरु आहे, ती केवळ माध्यमांच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. अजित पवारांनी कोणतीही बैठक बोलावलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे सध्या त्यांच्या भागात आहेत. दुसरे नेते अजित पवार हे बाकीच्यांना मार्गदर्शन करत आहेत. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही.”