अजित जगताप
Satara News सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात दलित बांधवांवर अन्याय अत्याचार होत आहेत. याची जाणीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या( आठवले गट) कार्यकर्त्यांना झाली आहे. (Satara News ) त्यामुळे सामान्य जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवार दि.२० जून रोजी दुपारी जन आक्रोश आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे. (Satara News )
सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
आज सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाबळेश्वर, पाचगणी सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे. याचाच फायदा घेऊन बेकायदेशीर टोल वसुली तसेच पर्यटकांची गैरसोय होऊन सुद्धा त्यांच्यावर प्रवाशी कर आकारणी केली जाते. त्यामुळे पाचगणी महाबळेश्वर सारखं पर्यटन स्थळ बदनाम होत आहे. वन वे म्हणजे जाताना वाई मार्गी पाचगणी व येताना कुडाळ मार्गी पुणे, सातारा असे नियोजन गैरसोयी चे होणार आहे.
नोकरी- व्यवसाय, शिक्षण, व्यापार स्थानिक उद्योग संस्था यावर परिणाम होणार आहे. त्याविरोधात ही लढा उभारण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ते तयार झालेले आहेत. असे ही गायकवाड यांनी सांगितले.
याची राज्य शासनाने दखल घ्यावी म्हणून त्याचा भाग म्हणून रिपब्लिकन वतीने आंदोलनाची भूमिका घेतली असून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले आहे. यावेळी आप्पासाहेब गायकवाड, प्रतिक गायकवाड, अशोक मदने, डॉ तात्यासाहेब जगताप, कुणाल गडांकुश, पूजा बनसोडे, स्वप्निल गायकवाड, आप्पा तुपे यांच्यासह तालुकाध्यक्ष, स्थानिक पातळीवर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.