अजित जगताप
Satara News | वडूज : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारून शोषित- दलित- कष्टकरी समाजाला प्रगतीसाठी योगदान देणारे शासकीय वरिष्ठ अधिकारी दिगवंत पोपट झेंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त खटाव तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अध्यक्ष तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांनी दिवंगत झेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
गुरसाळे ता खटाव येथील सुपुत्र असलेल्या पोपट झेंडे यांनी अभियंत्रिकी शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेमध्ये चांगल्या पद्धतीने काम केले. अनेकांना मदत केली. सेवानिवृत्तीनंतरही एक प्रगतशील शेतकरी म्हणून तसेच समाज बांधवांच्या प्रगतीसाठी तन मन धनासह सहकार्य करणारे पोपट झेंडे यांच्या प्रथम स्फूर्ती दिनानिमित्त विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. लष्करी सेवेतील वरिष्ठ अधिकारी स्वप्निल झेंडे, डॉ. बाळासाहेब झेंडे, अभियंता शंकर झेंडे, सागर झेंडे, पंचशील मंडळ आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
या प्रथम स्मृतीदिनी भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाला बुध्दाचार्य रणदिवे, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अशोक आबा गोडसे, वरिष्ठ दलित पॅंथर नेते अशोक बैले, वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले, पत्रकार अजित जगताप, भाऊसाहेब लादे, उत्तम म्हस्के, जितेंद्र कांबळे, संतोष भंडारे, सौ. राजेश्री म्हस्के, सौ. उमा झेंडे, चंद्रकांत कांबळे, भारत कसबे, अजित कंठे, गुरसाळे गावचे प्रतिष्ठित नागरिक भरत जाधव, निलेश जाधव, आदी मान्यवरांनी दिवंगत पोपट झेंडे यांच्या जीवन कार्याबद्दल गौरव उद्गागार काढले.
या कार्यक्रमाच्या वेळेला अनेकांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते. खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये बुद्ध विहार बांधण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभेल त्यासाठी सर्वांनीच स्मृतिदिनाच्या औचित्य साधून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News | खटाव बाजार समिती प्रचारात उमेदवार ; नेते तीस… सभेला मतदार वीस
Satara News | वडूजमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाल्याने स्फोट ; दोन महिला जखमी