Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ravindra Chavan : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा फोटो काढा, अ‍ॅपवर टाका ; बांधकाम विभाग घेणार दखल – मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 April 2023, 13:51

Ravindra Chavan पुणे : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा फोटो काढून तो अ‍ॅपवर अपलोड केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची तत्काळ दखल घेऊन दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाने या संदर्भात अ‍ॅपविकसित केले असून, तीन दिवसांपासून ते महिनाभरात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार आहेत.

अ‍ॅपद्वारे मोबाइलवरून तक्रारी करा…!

केंद्र सरकारच्या ‘एम सेवा अ‍ॅप’मध्ये नागरिकांना खड्ड्यांविषयी तक्रारी करता येणार आहे. बांधकाम विभागाच्या सिटिझन विभागात ही सेवा उपलब्ध केली आहे. ‘पॉटहॉल कम्प्लेंट रिड्रेसेल सिस्टीम’ (पीसीआरएस) या अ‍ॅपद्वारे मोबाइलवरून तक्रारी करता येणार आहे. रस्त्यावरील खड्ड्याचे मोबाइलवर फोटो काढून ते अ‍ॅपवर अपलोड करून त्याबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे. हे अ‍ॅप लवकरच ‘गुगल प्ले स्टोअर’वरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावरील सूचना, तक्रारींवर कार्यवाहीची सूचना संबंधित विभागाच्या कनिष्ट अभियंत्याला दिली जाईल. खड्डे दुरुस्तीनंतर संबंधित तक्रारदारास संदेशही जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

बांधकाम विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहीर, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पुणेचे अधीक्षक अभियंता एस. एम. चिखलीकर, कोल्हापूर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.

 

बैठकीदरम्यान मंत्री चव्हाण यांनी रस्त्यांच्या स्थितीचा, खड्डे भरण्याच्या कामांचा, इमारतींच्या कामाचा आढावा घेतला. सुरू असलेल्या सर्व कामांची ‘जिओ टॅग’ केलेली छायाचित्रे बांधकाम विभागाच्या ‘पीएमआयएस’ प्रणालीवर वेळच्या वेळी अधिकाऱ्यांनी अपलोड करावीत. यंत्रणेत पारर्शकता येण्यासाठी ऑनलाइन प्रणालीमध्ये नियमित माहिती भरावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. या वेळी मुख्य अभियंता चव्हाण यांनी रस्त्यांसह इतर कामांचा आढावा घेतला. ‘पीएमआयएस’मध्ये जनतेला ‘व्ह्यू राइट’ देण्याबाबत सुधारणा करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, नागरिकाच्या तक्रारीची अंमलबजावणी न केल्यास सात दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तरीही दखल न घेतली गेल्यास महिनाभरात तो खड्डा बुजवून मुख्य अभियंत्यांनी संबंधिताची तक्रार दूर करणे अपेक्षित आहे. या प्रत्येक हालचालीवर मंत्रालयातून लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी खड्ड्यांचे छायाचित्र अ‍ॅपवर डाउनलोड करताना त्यांचे ‘जीपीएस’ कार्यान्वित ठेवणे अपेक्षित आहे, अशी माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Satara News | दिवंगत सेवानिवृत्त अभियंता पोपट झेंडे यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने श्रद्धांजली...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.