अजित जगताप
Satara News | वडूज : राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशभर ‘भारत जोडो’ अभियानातून उदंड प्रतिसाद मिळाला. यामुळेच भाजपने राहुल गांधी यांचे लोकसभा सभासदत्व रद्द केले आहे. असा आरोप करत खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसने वडूज नगरीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. अशी माहिती पक्षाने पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य रणजीत सिंह देशमुख, खटाव तालुका अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, परेश जाधव, राहुल सजगणे, अभय कुमार, देशमुख, इम्रान बागवान, 0डॉ. महेश गुरव, अमरजीत कांबळे, आनंदा साठे, सदाशिव खाडे, सत्यवान कमाने, अभिजीत साबळे, विजयकुमार शिंदे, ॲड संदीप सजगने आदी उपस्थित होते.
वडूज बस स्थानक ते खटाव तहसील कार्यालया दरम्यान रॅली…
वडूज बस स्थानक ते खटाव तहसील कार्यालया दरम्यान रॅली काढून राष्ट्रीय काँग्रेसने सोमवारी दिनांक २७ मार्च रोजी आंदोलन करणार आहे. अशी माहिती यावेळी पक्षाच्या नेत्यांनी दिली.
इंग्रजांविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते लढले आहेत. ज्या राहुल गांधींच्या कुटुंबातील दहशतवादाच्या विरोधात रस्त्यावर रक्त सांडले. आज त्याच कुटुंबातील राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. सुरत न्यायालयाने ती वर्षाची शिक्षा सुनावली. त्यावर आपिल करण्यासाठी न्यायालयाने मुदत दिली आहे.
मात्र याचा कोणताही विचार नकरता मोदी सरकारने त्यांचे सदस्यत्व रद्द केले. यामुळे राहुल यांच्यावर अन्याय झाल्याची भावना देशभर पसरली आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी से डॉ. महेश गुरव, सत्यवान कमाने यांनी सांगितले.
ओबीसी व बी सी समाजाला सर्वाधिक धोका हा भाजप पासून आहे. राजकीय आरक्षण रद्द झाले तेव्हा भाजपने त्याला मुख्य संमती दिली होती. परंतु आता याच भाजपला ओबीसी बद्दल प्रेम वाटू लागले आहे. खरं म्हणजे ओबीसी समाजात अनेक सक्षम नेते असून सुद्धा त्यांना भाजप डावलत आहे. ही बाजू आता लोकांसमोर मांडण्यासाठी ओबीसींमध्ये जागृती निर्माण झालेली आहे.
राहुल गांधी यांनी संसदेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले. एवढेच नव्हे तर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी कर्ज बुडवे गिरी नीरव मोदी यांच्या विरोधात संसदेत आवाज उठविला. त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देण्याऐवजी काँगेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे खच्चीकरण करून भाजप पक्ष एकाधिकारी बाजूला झुकल्याचे सिद्ध झालेले आहे. असा आरोप यावेळी पक्षाने केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Satara News | नवीन रस्त्यात पडतात खड्डे;तरी काही करतात नेत्याचे ;बर्थडे
Satara News : वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण..?