उरुळी कांचन, (पुणे) : भवरापूर (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय सदाशिव साठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
भवरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन सातव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २५) कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मागील काही दिवसापासून हि निवड रखडली होती. अखेर त्याला गुरुवारी मुहूर्त मिळाला. माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साठे यांनी प्रास्ताविक करून अध्यक्षपदी संजय साठे यांचे नाव सुचविले व त्यावर ग्रामसभेसाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी एकमताने अनुमोदन दिले व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संजय साठे यांचा सरपंच, सदस्य, व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भवरापूरचे सरपंच सचिन सातव, माजी सरपंच बबनराव साठे, सुभाष साठे, चेअरमन अशोकराव साठे, माजी उपसरपंच दिलीप साठे, वनिता साठे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी साठे, योगश साठे, जानकुबाई सातव, शकुंतला टिळेकर, ग्रामसेवक ताम्हाणे, माजि तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव साठे, शिवाजी साठे, विनोद साठे, नंदकुमार टिळेकर, पोलिस पाटील चंद्रकांत टिळेकर, शरद चौधरी, गणेश साठे, महेश साठे, सौरभ साठे, अभिषेक साठे, बाळासाहेब साठे, संदिप साठे, अंकुश साठे, केशव साठे, गणेश सातव, कैलास साठे, रवींद्र साठे, संभाजी कार्हाळे, निलेश गायकवाड, बजरंग गायकवाड, रूपाली चौधरी, गौरव साठे, तेजस साठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना माजी सरपंच सुभाष साठे यांनी केली तर आभार माजी सरपंच बबनराव साठे यांनी मानले.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय साठे म्हणाले, “मुळात या गावात तंटेच होत नाही आणि झालेच तर सर्वांना बरोबर घेऊन समजुतीनेच त्याच्यावर तोडगा काढला जाईल व गावामध्ये जास्तीत जास्त झाडे लावून ती कशी जगवता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्वाचे आभार..”