Sanjay Raut मुंबई : ‘महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण, ही सुव्यवस्था त्यांच्यामुळं कोसळलीय. आम्ही जनतेच्या हितासाठी काढत असलेल्या मोर्चाला परवानगी नाकारली जातेय. (Sanjay Raut) आम्ही कोण आहोत? हा अतिरेक्यांचा मोर्चा आहे का?,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. (Sanjay Raut)
मुंबईतील शिवसेनेच्या शाखेवर झालेली कारवाई आणि १ जुलैच्या मुंबई महापालिकेवरील मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी यावरून शिंदे गट आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कुणीही करत असेल तर आम्ही सगळे शिवसैनिक सगळे घाव, खटले, गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. मिस्टर फडणवीस, आपण गृहमंत्री असाल, पण आम्ही शिवसैनिक आहोत.’
शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर येत्या १ जुलैला विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते. मात्र ठाकरे गटाच्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोर्चाची परवानगी नाकारली आहे.