Ajit Pawar पुणे : ‘सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही, अशी चिंता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर व्यक्त केली आहे. (Ajit Pawar) याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. (Ajit Pawar

अजित पवार म्हणाले की, ‘विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसत आहे. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही.’

पुण्यात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनांमुळे अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.







