पुणे : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवार ऋषी सुनक यांचा पराभव करणाऱ्या लिझ ट्रस यांनी लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांमध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देतील अशा चर्चा सुरु होत्या. लिझ ट्रस यांनी राजीनाम्यानंतर त्यांची बाजू मांडली आहे.
लिझ ट्रस यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ब्रिटनच्या राजकारणातील घडामोड या निमित्तानं समोर येत आहे. लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानं आता पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, पेनी मॉर्डंट, ऋषी सुनक यांची नावं पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
लिझ ट्रस यांनी मी जी आश्वासनं दिली होती ती सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण करु शकले नाही, त्यामुळं पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. जेव्हा मी पंतप्रधान बनले त्यावेळी देशात आर्थिक स्थिरता नव्हती. देशातील नागरिकांना वीज बिल कसं भरायचं याची चिंता होती. आम्ही कर कपातीचं स्वपन पाहिलं होतं. मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वर्तमानात ते शक्य नसल्यानं राजीनामा देत आहे, असं त्या म्हणाल्या.