पुणे : Raj Thakare – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी त्यांच्या गाड्यांचा ताफा हा मुंबईवरून पुण्याकडे रवाना झालेला होता. त्यामुळे ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील. असे कार्य़कर्त्यांना वाटले होते. (Raj Thakare) परंतु त्यांना पुण्यातील मनसे कार्यालयाला अचानक भेट दिल्याने पदाधिकाऱ्यांना चांगलीच धावाधाव करावी लागली. (Raj Thakare)
राज ठाकरें यांनी ताफा पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयामध्ये वळवला
ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातल्या घरच्या ठिकाणी त्यांनी थोड्यावेळ विश्रांती घेतल्यानंतर साधारणतः 5:40 च्या दरम्यान त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा पुण्यातल्या त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये वळवला.
राज ठाकरे हे जेव्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आले, त्यावेळेस त्यांना मनसेचे कोणतीही पदाधिकारी कार्यालयामध्ये दिसले नाहीत. केवळ दोन कार्यकर्ते हे मनसेच्या कार्यालयामध्ये बसले होते. मनसेचे नेते बाबू वागस्कर व शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे दोघे देखील महापालिकेच्या प्रांगणामध्ये कामानिमित्त होते. त्यांना त्या ठिकाणी फोन आल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये धाव घेतली.
त्यावेळेस राज ठाकरे आणि अनिल शिदोरे हे दोघे पक्ष कार्यालयामध्ये बसलेले त्यांना पाहायला मिळालं परंतु राज ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे चांगलीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भुमिकेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे बोलले जात आहे, त्यात आता राज ठाकरे पुण्यात असल्याने ते बोलणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Raj Thackrey | पुण्यातील श्वान संगोपन केंद्राचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन…!
Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिस ठाण्यात तक्रार…!
Sanjay Raut : संजय राऊत म्हणतात…राज ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात..!