Pune News : पुणे : राषट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केली. या घटनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. दोन गटांमध्ये नेते तसेच कार्यकर्ते विखुरले गेले. यामुळे आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. बारामतीमधून पार्थ पवार हे सुप्रियाताईंच्या विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. भाजपने कितीही ताकद लावली तरी पार्थ पवार सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही. कुटुंबाच्या विषयात काही झालं तरी अजितदादा वेगळी भूमिका घेणार नाहीत, हे मी कुटुंब म्हणून सांगतोय, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
पार्थ पवार सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी त्यांच्याविरोधात बारामतीमधून कोणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pune News ) याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार म्हणाले की, भाजपवाले लोकनेत्यांना जवळ घेतात आणि नंतर त्यांना संपवतात. मला भीती वाटते की भाजपवाले अजित पवार यांची देखील ताकद कमी करतील.
रोहित पवार म्हणाले की, भाजपने अनेक लोकमान्यता असलेले नेतृत्व संपवले आहे. सध्या भाजपच्या विरोधात देशात वातावरण आहे. अनेक मोठे नेते आपल्यातच गुंतून रहावे यासाठी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने फोडला. आम्ही उत्तर-प्रत्युत्तर देतोय आणि भाजप वेगळं राहतोय, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते एसीमध्ये बसून मजा बघतायत आणि आम्ही आपापसांत भांडतोय. (Pune News ) कुटुंब-पक्ष कोणी फोडला, याची जाणीव या महाराष्ट्रातील जनतेला आहे. जनता या गोष्टी कधीही विसरणार नाही.
रोहित पवार यांनी यावेळी अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमधील कार्यक्रमाच्या बॅनरवर फक्त छगन भुजबळांचा फोटो होता. त्या बॅनरवर अजितदादांचा फोटो का लावला नाही? असा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी अजितदादांना सहज बाजूला काढलं आहे. पक्ष फुटीचे खापर त्यांनी अजितदादांवर फोडलं आहे. (Pune News ) बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला मराठी अस्मिता जपण्यासाठीचा पक्ष देखील यांनीच फोडला आहे. फक्त फोडाफोडीचे राजकारण करणे, हाच यांचा उद्देश आहे.
अजितदादांसोबत गेलेले लोकच त्यांनी व्हीलन बनवत आहेत, याबद्दल त्यांनी खएद व्यक्त केला. (Pune News ) विकासासाठी निर्णय घेतला असं हे सांगत आहेत, मग यांच्याकडे पद होते तेव्हा त्यांनी काय केले? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरला; थेट सातव्या श्रेणीपर्यंत घसरण