(Devendra Fadnavis) मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिरुर व खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या उर्वरित कामासाठीचा जवळपास 1356 कोटीं रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला येत्या दोन महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबत विधानसभा सदस्य अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील, राजेश टोपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…!
चासकमान प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेऊन लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. तसेच अतिक्रमणाबाबतही काही तक्रारी आहेत,त्याची चौकशी करण्यात येईल. जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या कामाचेही सर्वेक्षणाचे काम सुरु असून, त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका!
Pune Crime : ओपन जीममध्ये वीजेच्या धक्क्याने २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू!
Pune Crime | पुणे : ‘त्या’ गैरसमजातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; गुन्हा दाखल!