Pune News पुणे : भोसरी येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ११०३ कोटी रुपयांच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) गृह प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्याहस्ते मंगळवारी (ता.१ ऑगस्ट) होणार आहे. तसेच पुढील दोन वर्षात हा प्रकल्प पुर्ण होऊन यातून ६४५२ परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
भोसरी येथे पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत (PMAY) गृहप्रकल्प १ व २ मध्ये आर्थिक दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन गटांसाठी (LIG) एकूण ४८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले असून त्यामधील ३२०० लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा दिला आहे.(Pune News)
४८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले.
आता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भोसरी (पेठ क्र.१२) येथे दुसऱ्या टप्यामध्ये ११.६३ हे. आर क्षेत्रावर गृहप्रकल्प ३,४ व ५ मध्ये आर्थिक दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन गटांसाठी (LIG) एकूण ६४५२ सदनिकांचा गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे.(Pune News)
दरम्यान, या प्रकल्पाच्या प्रशासकीय अंदाजपत्रक रक्कम ११०२.९२ कोटी व निविदा रक्कम ७३० कोटी यास मान्यता प्राप्त असून शासनाकडील अनुषंगिक परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. सदर गृहप्रकल्पांचे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी होणार आहे. व येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पुर्ण होऊन यातू ६४५२ परवडणारी घरे उपलब्ध होतील .(Pune News)