Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : ‘वेस्ट टू एनर्जी’, ‘प्रधानमंत्री आवास’चे मंगळवारी लोकार्पण ; भाजपा आमदार महेश लांडगे यांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 July 2023, 18:53

Pimpri News : पिंपरी, ता. २९ : ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अंतर्गत हाती घेतलेला राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वयीत झाला आहे. तसेच, सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार ७५ घरांची निर्मिती होत आहे. ही बाब निश्चितच समाधानाची असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.(Pimpri News)

‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील वचनपूर्तीचे समाधान.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन आणि डूडूळगाव व सेक्टर- १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.(Pimpri News)

या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार, अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे यांच्यासह पुण्यातील लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.(Pimpri News)

मोशीकरांची दुर्गंधीतून सुटका…

 

समाविष्ट गाव मोशी येथील कचरा डेपोवर शहराच्या स्थापनेपासून कचरा टाकला जात होता. या ठिकाणी १९९१ मध्ये कचरा डेपोची अधिकृत घोषणा करण्यात आली. कचऱ्याचे डोंगर उभा राहिले. मात्र, ३० वर्षांमध्ये याठिकाणी एकही कचरा प्रकल्प कार्यान्वयीत झाला नाही. परिणामी, मोशी आणि परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामुळे आता मोशीकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.(Pimpri News)

शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर…

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख औद्योगिकनगरी, कामगार नगरी अशी आहे. तसेच, आता महाराष्ट्रातील प्रगतीशील शहर आणि ‘फ्युचर सिटी’ म्हणून पाहिले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून या शहरात नागरिक वास्तव्यास येत आहेत. त्यामुळे प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीला हक्काचे घर मिळावे. यासाठी आम्ही प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प केला. तो पूर्णत्वास नेत तब्बल १७ हजार ७५ घरांची निर्मिती होत आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडीतील १२८८ घरांचा चावी वाटप कार्यक्रम आणि डुडूळगाव व प्राधिकरण सेक्टर-१२ मधील प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. आगामी काळात प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराला हक्काचे घर मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.(Pimpri News)

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले कि,
‘भोसरी व्हीजन-२०२०’ मधील एक-एक प्रकल्प पूर्णत्वास नेत असताना अत्यंतिक समाधान वाटते. पिंपरी-चिंचवड शहर आणि नागरिकांच्या दृष्टीने आगामी ३० वर्षांतील वाढत्या लोकसंख्येच विचार करुन नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत.(Pimpri News)

सन २०१४ मध्ये ज्या मुद्यांवर निवडणूक लढवली. त्यापैकी एक कचरा प्रश्नावर ‘वेस्ट टू एनर्जी’च्या माध्यमातून आश्वासनपूर्ती झाल्याचे समाधान आहे. आगामी काळात निश्चितपणे एक विकसित आणि प्रगतीशील शहर आणि ‘फ्युचर सिटी’चा नागरिक म्हणून पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटेल, असे शहर घडवण्याचा आमचा संकल्प आहे.(Pimpri News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव! मोबाईल-प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; धुराचे लोट अन् नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 8:27

IT विद्यार्थ्यानेच बनवलं बनावट अ‍ॅप! PMPMLला लावला चुना; चाणाक्ष कंडक्टरने 5 बनावट प्रवासी पकडले

Sunday, 6 September 2026, 8:11

अचानक अंगावर झडप घातली, कुत्र्यांनी चेहऱ्याचे लचके तोडले; जुन्नरमध्ये रस्त्यावर महिलेसोबत भयंकर प्रकार!

Sunday, 6 September 2026, 7:57

आभाळ पुन्हा भरून येणार! मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम,; हवामान विभागाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 7:41

रविवार ठरणार लकी! सूर्यदेवाची कृपा, धनलाभाचे जोरदार संकेत; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Sunday, 6 September 2026, 7:14

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13
Next Post

Pune News : भोसरी येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ११०३ कोटी रुपयांच्या गृहप्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्याहस्ते मंगळवारी होणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp