Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अचानक अंगावर झडप घातली, कुत्र्यांनी चेहऱ्याचे लचके तोडले; जुन्नरमध्ये रस्त्यावर महिलेसोबत भयंकर प्रकार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 September 2026, 7:57

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. 2 परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक उच्छाद मांडत समोर येणाऱ्यांवर जीवघेणा हल्ला चढवला असल्याची माहिती समोर आली आहे . या रक्तरंजित घटनेत 85 वर्षांच्या एका वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या असून संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उंब्रज भागात या घटनेची सुरुवात झाली. भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्याने प्रथम परिसरातील 2 ते 3 पाळीव जनावरांवर आणि एका दुसऱ्या कुत्र्यावर हिंसक हल्ला केला. या प्राण्यांना जखमी केल्यानंतर कुत्र्याने रस्त्याने चाललेल्या कुसुम शांताराम हांडे (वय 85) यांच्याकडे धाव घेतली. काही समजण्याच्या आतच या प्राण्याने थेट त्यांच्या चेहऱ्याचा चावा घेतला. या भीषण हल्ल्यामुळे कुसुम हांडे या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कुसुम हांडे यांना स्थानिकांनी तातडीने प्रथम नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मंचर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी तपासणीनंतर हा ‘कॅटेगरी 3’ प्रकारचा अत्यंत गंभीर हल्ला असल्याचे स्पष्ट केले.

आता महिलेची ढासळती प्रकृती लक्षात घेता त्यांना 108 रुग्णवाहिकेने पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या ससून रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

 

या घटनेनंतर उंब्रज आणि आसपासच्या परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. भटक्या प्राण्यांचा वावर वाढल्याने अशा घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी सतर्कता बाळगावी, तसेच लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55
Next Post

IT विद्यार्थ्यानेच बनवलं बनावट अ‍ॅप! PMPMLला लावला चुना; चाणाक्ष कंडक्टरने 5 बनावट प्रवासी पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp