पुणे : सद्या पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. आरोप प्रत्यारोप होते आहे. अशातच पुण्यातल्या हॉटेलच्या बाथरुममध्ये तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून राजकीय टोलवाटोलवी सुरु झाली. ड्रग्ज प्रकरणावरून महायुतीतल्याच दोन दादांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटलांनी याबाबत सुरवात केली आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
आपण पुण्याचे पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अर्थात चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा रोख पुण्याचे विद्यमान पालकमंत्री अजित पवारांकडे दिसून येत आहे. मात्र नंतर चंद्रकांत पाटलांनी नंतर सारवासारव केली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाब्दिक टोलेबाजी सुरु झाली आहे.
पब, हफ्ता वसुली आणि डान्सबारला राजाश्रय चंद्रकांत पाटलांचाच होता. असं अमोल मिटकरी म्हणालेत. तर पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटलांनी फक्त खुर्च्या गरम केल्या, असं सुरज चव्हाण म्हणालेत आहे. यावरून महायुतीतच शाब्दिक खटके उडायला लागले आहेत. तर ज्या पुण्यातल्या L3 लिक्विड लिजर लाऊज पब मधला ड्रग्जचा व्हिडीओ समोर आला.
त्या पबवर पतित पावन संघटनेनं दगडफेक करत तोडफोड केली. मनसेनंही पबच्या बाहेर आंदोलन केलं आहे. पब संस्कृती बंद करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यात नुकतंच पोर्शे कारनं दारु नशेत अल्पवयीन मुलानं दोघांना चिरडल्याचं प्रकरण समोर आलं. तरीही पुण्यात पहाटेपर्यंत पब कसे सुरु राहतात, हे L3 पबमधला व्हिडीओ समोर आल्यावर स्पष्ट झालं. दोन अल्पवयीनं तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. यात 2 तरुणी ड्रग्जचं सेवन करताना दिसत आहेत.