(Politics News) पुणे : आगामी विधान सभेच्या निवडणुकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जागा वाटपाच्या केलेल्या वक्तव्यामुळे शिवसनेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. केवळ 48 जागाच देणार यामुळे शिरसाट यांना चांगलेच बोचले आहे. यावर त्यांनी संताप व्यक्त करत . फक्त 48 जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे.
बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही…!
शिरसाट म्हणाले की, “बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार…अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त 48 जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो
. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा. बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला आहे? अशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असते.
बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असे विधान केले आहे. त्यांना वाटत आहे की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश!
Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी आज संपावर ; कामकाजावर होणार परिणाम!