Politics News : आमदार बच्चू कडू यांनी विधान सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पेटले आहे. त्यांच्या विधानामुळे थेट आसामच्या विधान सभेत गोंधळ घातला आहे.त्यामुळे बच्चू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आसाम राज्याच्या विधान सभेत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
बच्चू कडू यांनी ‘श्वानां’वरून केलेल्या वक्तव्याचा आसाममधील आमदारांनी निषेध नोंदवला…
अचलपूरचे आमदार बच्चू कडू सध्या दिल्ली आणि आसाममध्ये चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांनी ‘श्वानां’वरून केलेल्या वक्तव्याचा आसाममधील आमदारांनी निषेध नोंदवला आहे.
”महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात. या श्वानांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली. असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते.
या वक्तव्यावरून आसामच्या विधानसभेत विरोध पक्षातील आमदारांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष ; उदयनराजे भोसले
Politics News : राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध ; रवींद्र धंगेकर