गणेश नारंग
Pimpri News : पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या युवक व क्रीडा विभाग अध्यक्ष पदी समिता राजेंद्र गोरे यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते समिता राजेंद्र गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. (Maharashtra Pradesh Congress Committee Youth and Sports Cell President Samita Rajendra Gore)
नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
समिता राजेंद्र गोरे या स्वतः राष्ट्रीय खेळाडू व पिस्टल शूटिंग प्रशिक्षक आहेत. आहार विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.(Pimpri News) समिता राजेंद्र गोरे यांची काँग्रेस युवक व क्रीडा विभाग अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार आहे.
गोरे या गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड परिसरामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करत आहेत. महिला भगिनींना रोजगार प्रशिक्षण देऊन व्यवसायात संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यातच त्यांचा शहरात जनसंपर्क मोठा असून सर्वसामान्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी त्या नेहमी कार्यरत असतात. (Pimpri News) कोरोनाकाळातही त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत विविध माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करत दिलासा देण्याचे काम केले. अशी अनेक सामाजिक कार्य करण्यात समिता राजेंद्र गोरे या नेहमी प्रयत्नशील असतात.
गोरे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, (Pimpri News) त्याचबरोबर समिता राजेंद्र गोरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नियुक्तीबद्दल शुभेच्छा देण्यात येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी-चिंचवड आरटीओ कडून दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
Pimpri News : दिघीत महिलेचा विश्वास संपादन केली फसवणूक; सोने व रोख रक्कम लंपास
Pimpri News : मोशी परिसरातील धोकादायक वीजवाहिनी होणार भूमिगत