सुरेश घाडगे
Paranda News : परंडा ( जिल्हा धाराशिव) : परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक आज २४ मे रोजी होती. या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे ८ सदस्य गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली. या सदस्यांचे अपहरण करून त्यांना -सांगली मार्गावरील घुमटा परिसरात सोडून देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने केला जात असून या प्रकाराशी आमचा काहीही संबंध नाही असे विरोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सदस्यांचे अपहरण झाले होते का? की विरोधकांना अडचणीत आणण्याची ही खेळी होती असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. (8 members of the Mahavikas Aghadi were kidnapped on the day of Paranda Agricultural Produce Market Committee Chairman, Deputy Chairman election?)
महाविकास आघाडी व महायुती कार्यकर्त्यांत हाणामारी
दरम्यान या घटनेमुळे होऊन बाजार समिती आवारात वातावरण तप्त झाले. महाविकास आघाडी व महायुती कार्यकर्त्यांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. (Paranda News) पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. या सर्व प्रकारामुळे निवडणूक तहकुब करून शुक्रवार २६ मे रोजी ठेवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १३ जागा मिळवल्या होत्या (Paranda News) तर सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने ५ जागा मिळवल्या होत्या. यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता होणार हे स्पष्ट झाले होते.
सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठीची विशेष सभा २४ मे रोजी ठेवण्यात आली होती. या अनुषंगाने मोटे पाटील यांनी काळजी म्हणून या पदाच्या स्पर्धेत असलेल्या ८ संचालकांना सहलीवर पाठवले होते .(Paranda News) हे ८ जण उजणी-टेंभूर्णी येथील विश्रामगृह येथे होते. येथून बुधवार २४ मे रोजी सकाळी ७ : ३० वाजण्याच्या सुमारास या संचालकांना जवळपास ५० अनोळखी लोकांनी अपहरण करुन जायबंदी केले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या संचालकांना मिरज-सांगली मार्गावरील घुमटा परिसरात सोडून देण्यात आले.
तर या निवड प्रक्रियेसाठी एकही संचालक हजर राहिला नाही. (Paranda News) त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विशेष सभा तहकूब केली. शुक्रवार २६ मे रोजी विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :