पुणे : जत (जि. सांगली) तालुक्यातील ४० गावांचा वाद ताजा असतानाच, आता सोलापूर जिल्ह्यातील गावांवरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी यांनी दावा केला आहे. हा दावा बोम्मईंनी यांनी अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट वरून केला आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी ट्विट मध्ये असे म्हणाले, ‘कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे’ असे बोम्मई म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे बोलताना बोम्मईंनी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असल्याचे बोम्मई म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
त्यानंतर महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असे सणसणीत उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसवराज बोम्मई यांना दिले होते. ज्या ठरावाचा उल्लेख बोम्मई यांनी केला आहे, तो ठराव २०१२ साली केला होता. त्यानंतर कुणीही अशा प्रकारची मागणी केली नाही. असेही स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
चौकट : पाकिस्तान देखील कर्नाटक सरकारसारखे काम करत नाही : नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटचा जोरदार निषेध नोंदविला असून कर्नाटक सरकार समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करताना पाकिस्तान देखील कर्नाटक सरकारसारखे काम करत नाही, असा टोला देखील बोम्मई यांना लगावला आहे.