(Nitin Gadkari) नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व भाजपचे नेते यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकीचा फोन आला आहे. फोनवर १० कोटींची खांडणीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जयेश पुजारीच्या नावाने धमकी…!
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला. दोन वेळा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारी या नावाने फोन केला. त्याने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली.
दरम्यान, एकापाठोपाठ एक धमकीचे फोन आल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.धमकीच्या फोननंतर पोलिसांनी गडकरी यांच्या कार्यालयाची आणि घराची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॅा. नितीन घोरपडे!