New Delhi : नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्तवली आहे. खर्गे यांनी बनवलेल्या आरखड्यानुसार सुमारे डझनभर राज्यांचे काँग्रेस अध्यक्ष बदलण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी आणि पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी परदेशातून परतल्यानंतर जून अखेरपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते.
दरम्यान, काँग्रेस पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर खर्गे यांनी काँग्रेसच्या संघटनेतील बदलांना अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. सध्या मल्लिकार्जुन खर्गे राहुल-सोनिया गांधी यांचीची वाट पाहत आहेत. (New Delhi) गांधी कुटुंबातील हे सदस्य परत येताच खर्गे त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. त्या चर्चेनंतर हे बदल पक्षासमोर मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
… या जिल्ह्यातील काँग्रेसचे अध्यक्षांना हटविण्याची शक्यता
* अनिल चौधरी- दिल्ली, अलागिरी- तामिळनाडू, मोहन मरकम- छत्तीसगड, राजेश ठाकूर- झारखंड, ब्रिजलाल खबरी- यूपी, अधीर रंजन चौधरी- बंगाल, गोविंद सिंग दोतासरा- राजस्थान, (New Delhi) नबाम तुकी- अरुणाचल प्रदेश, सुधाकरन- केरळ, नाना पटोले- महाराष्ट्र तर त्याचवेळी सुमारे डझनभर राज्यांच्या प्रभारी सरचिटणीसांना हटवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* पंजाब, यूपी, बंगाल, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तामिळनाडू, पुडुचेरी, आसाम, ओडिशा, उत्तराखंड यांचाही यामध्ये समावेश आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी लवकरच पक्ष संघटनेत नव्या टीमची घोषणा केली जाईल, असे म्हटले होते.
* हरीश चौधरी, अविनाश पांडे, ओम्मान चंडी, एच. के. पाटील, दिनेश गुंडूराव, देवेंद्र यादव या नेत्यांना केंद्रीय संघटनेतून काढून राज्यांमध्ये पाठवले जाण्याची शक्यता आहे.
* बीके हरिप्रसाद, अलका लांबा, गौरव गोगोई, ज्योती मणी, संजय निरुपम, दीपेंद्र हुडा यांसारख्या नेत्यांना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते.
* प्रियांका गांधी आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना २०२४ च्या निवडणुकीसाठी रणनीती बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
* काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका गांधी यांची मोठी भूमिका असणार आहे.
* नोव्हेंबरमध्ये ५ वर्षे पूर्ण करत असलेल्या काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचाही काँग्रेसवर मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, गांधी कुटुंबीयांबरोबर चर्चा करून खर्गे यांना कायम ठेवायचे (New Delhi) की केरळची कमान सोपवायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासोबतच युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादलाचे नवे प्रमुखही करण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
New Delhi News : नवीन संसदभवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून मंत्रोच्चारासह आशीर्वाद