Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : शिंदेंची जाहिरात सरड्यासारखी… जितेंद्र आव्हाडांची टीका; म्हणाले,…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 13:06

Mumbai News : मुंबई : राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये काल (ता. १३) “राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे” अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. या जाहिरातीने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले. भाजप-शिवसेना युतीत धुसफूस असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांना डावलल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज (बुधवार, ता. १४) शिंदे गटाने नवी जाहिरात देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

त्यांना काहीच वाटत नाही

दरम्यान, या जाहिरातबाजीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. जाहिरातीविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शिंदेंची (Mumbai News) आजची जाहिरात ही सरड्यासारखी आहे. हे सगळं सरड्याच्या रंगांसारखं आहे. त्यांना काहीच वाटत नाही. अख्खा महाराष्ट्र पहिल्या पानावरची जाहिरात वाचतो. आज एक जाहिरात येते, उद्या एक जाहिरात येते… म्हणजे यांची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी (राजकीय विश्वासार्हता) शून्य झालीच आहे. परंतु बौद्धिक क्रेडिबिलिटी पण आज शून्य झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी प्रसिद्ध केलेली जाहिरात शिंदे गटाने दिलीच नव्हती, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केली. या प्रतिक्रियेमुळे या गोंधळात अजून भर पडली. शिवसेनेने जाहिरात दिली नाही, मग आजची जाहिरात कुणी दिली? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आव्हाड म्हणाले,(Mumbai News)  ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. आज ना उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील, मला पंतप्रधानच व्हायचंय… अशा शब्दांत आव्हाड यांनी टीका केली.

 

दरम्यान, राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज (बुधवार, ता. १४) शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. (Mumbai News) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” अशा शीर्षकाने जाहिरात देत, उत्तरार्ध केला आहे. सलग दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन जाहिराती प्रसिद्ध झाल्याने त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : शिंदे सरकार पुढील दोन महिन्यांत पडणार; संजय राऊतांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ

Mumbai News : राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे… ही घोषणा भाजप नेते देतील का?; अजित पवारांनीही साधला “त्या” जाहिरातींवर निशाणा!

Mumbai News : बंद दाराआड देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना मंत्र्यांना कानमंत्र; म्हणाले, आपण एकत्रच…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post

New Delhi : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार; डझनभर राज्यांचे अध्यक्ष बदलणार? काय आहे रणनिती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.