Nashik News : नाशिक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. आम्ही राष्ट्रवादीमध्येच असल्याचा दावा करत अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. काल राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांना हटवल्यानंतर आज नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाकडून नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
पोलीस बंदोबस्तात वाढ!
दरम्यान, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर कार्यालयात कोणालाही प्रवेश देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी घेतली आहे. (Nashik News) यामुळ नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. (Nashik News) पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे कारण देत संतप्त झालेल्या शरद पवार यांनी दोन नेत्यांवर कारवाई केली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ उडाली आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी भाजपसोबत युती करणार होती. राष्ट्रवादीच्या ५१ आमदारांनी शरद पवार यांना पत्र दिलं होतं, (Nashik News) असा खळबळजनक दावा पटेल यांनी केला आहे. एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना हे पत्र देण्यात आलं होतं, असा दावा देखील प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना ऊत आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nashik News : हृदयद्रावक! आई-वडील पंढरपूरच्या वारीत असताना लेकराचा अपघातात मृत्यू, नाशिक हळहळले