Nanded News : नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमधील जाहीर सभेत मुस्लिम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुस्लिम आरक्षण नसावे, असे भाजपचे मत असल्याचे ते म्हणाले. ते संविधानाच्या विरोधात आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतानाच उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडतानाच विशेष करून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जोरदार लक्ष्य केले. (Amit Shah’s big statement in the meeting in Nanded, said, our goal is to end Muslim reservation…)
उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना विचारतो की कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारला इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकर मिटवायचे आहेत. (Nanded News) तुम्ही याच्याशी सहमत आहात का?” मी नांदेडच्या जनतेला विचारतो की महान देशभक्त, त्याग पुरूष वीर सावरकर यांचा सन्मान करायचा की नाही? उद्धवजी, तुम्ही दोन बोटीत पाय ठेवू शकत नाही… उद्धवजी म्हणतात की आम्ही त्यांचे सरकार पाडले. त्यांचे सरकार आम्ही पाडले नाही. तुमच्या दुटप्पी भूमिकेला कंटाळून शिवसैनिकांनी तुमचा पक्ष सोडला आहे
शिवसेना-भाजप युतीवर भाष्य
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार असे उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले होते. त्यामुळे अस झालं का नाही? याचे उत्तर द्या 370 हटवलं हे योग्य केलं की नाही? राम मंदिर उभारणी योग्य आहे की नाही? या सगळ्यांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावी.(Nanded News) ते पुढे म्हणाले की, मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही. मुस्लिम आरक्षण पाहिजे की नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगावं. द्यायला पाहिजे की नाही हे सांगावं. जेवढे प्रश्न उभे केले आहेत या सगळ्यांचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी जनते समोर द्यावे.
नरेंद्र मोदींनी देशाचा जगात नावलौकिक केला
नरेंद्र मोदीजींनी देशाच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा आदर करण्याचे काम केले आहे. त्यांनी जगामध्ये भारताचा गौरव केला आहे. आज ते जगात कुठेही गेले तरी मोदी-मोदीजींच्या घोषणा दिल्या जातात. (Nanded News) जगातील काही दिग्गज त्यांना बॉस म्हणतात, तर काही त्यांच्या पायाला स्पर्श करतात. त्यांनी भारताचा झेंडा जगभर फडकवला आहे. हा सन्मान मोदीजींचा नसून आपल्या जनतेचा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Accident : भीषण अपघाताने पुन्हा पुणे हादरले! इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार 2 जखमी…!