Nagar News : अहमदनगर : राजकारणात चढाओढ, आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी नवीन नाही. निवडणुकीत आपण चुरस, धुरळा पाहतो. कोण बाजी मारतं? याचं निरीक्षण करतो. पण निकाल या सगळ्या चढाओढींच्या पलिकडे निघाला तर आपणही आपल्या डोक्याला हात लावून बसतो. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा लागलेला निकाल. कर्जतच्या बाजार समितीवर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर निकाल लागला असून, कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत भाजपनं रोहीत पवार यांना मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. (Big blow to Rohit Pawar in Karjat Bazar Committee; Speaker, Deputy Speaker of BJP!)
राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यापैकी अनेकांनी बाजीदेखील मारली आहे. तर काहींना अपयश आलेलं बघायला मिळत आहे. निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात महत्त्वाचा हात असलेले रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. (Nagar News) त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही लढत जास्त प्रतिष्ठेची होती. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच कर्जत बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. कर्जत बाजार समितीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून आपली पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली होती.
भाजपच्या गटाचे सभापती आणि उपसभापती पदाचे उमेदवार विजयी
पण या निवडणुकीचा निकालच अनोखा लागला. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी ९ जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित ९ जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. (Nagar News) दोन्ही बाजूने समान संख्याबळअसल्यानं कर्जत बाजार समितीमध्ये सभापती नेमका कोणाचा होणार? कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या निवडणुकीत राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या गटाचे सभापती आणि उपसभापती पदाचे दोनही उमेदवार विजयी झाले आहेत. सभापतीपदी काका तपकिरे तर उपसभापतीपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे.
कर्जत बाजार समितीची निवडणूक शिंदे आणि पवार यांनी प्रतिष्ठेती बनवली होती. (Nagar News) या बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, या बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटाचे प्रत्येकी ९ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यामध्ये राम शिंदे यांनी बाजी मारली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार कारवाई..