Mumbai News : मुंबई : हिंमत असेल तर मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा. नाही छाताडावर पाय रोवून भगवा झेंडा शिवसेनेचा फडकवला तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सांगणार नाही. महापौर हे त्या शहराचे कुंकू असते. पण आज मुंबई, पुण्याला, ठाण्याला, नागपूरला महापौर नाही. महापौरांविना शहर म्हणजेच तुम्ही आमचे कुंकू पुसले आहे…अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना आव्हान दिले.
महाराष्ट्र, मुंबई विकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा नुकताच वरळी येथे घेण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याला संबोधित केले. संजय राऊत म्हणाले, आमचे भांडण हे या महाराष्ट्र द्रोह्यांशी आहे. (Mumbai News) महाराष्ट्र, मुंबई विकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमचे भांडण आहे. अनेक मोठमोठे उद्योग गेले. क्रिकेटसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर नेले जात आहे. गेल्या काही वर्षात क्रिकेटचे सर्वात मोठे मैदान अहमदाबादला गेले. क्रिकेट हा मुंबईला रोजगार देणारा खेळ आहे, जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, नाशिक, बंगलोर आणि देवास (मध्यप्रदेश) येथे नोटा छापण्याचे कारखाने आहेत. तिथून ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा बेपत्ता झाल्या. छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले. (Mumbai News) आता हे ट्रक गेले कुठे. तीन नोटा छापणाऱ्या कारखान्यातून नोटा गायब होतात. राज्यात हा जो खेळ झाला, त्यासाठी हे पैसे वापरले नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे गटाला रामराम करणाऱ्या नेत्यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. राऊत म्हणाले की, आज सकाळी आपल्याकडल्या एक बाई पक्ष सोडून गेल्याचं मला कळलं. त्या बाईंना घाई फार होती. (Mumbai News) आल्याही घाई-घाईत गेल्याही घाईघाईत. हे खरे शिवसैनिक नाहीत. राज्यव्यापी शिबिर ही खरी शिवसेना आहे. ही शिवसेना राज्याला आपली धगधगती मशाल तेवून नेईल. असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
सध्या डुप्लिकेट माल खूप आहे. जत्रेमध्ये खूप डुप्लिकेट माल असतो. डुप्लिकेट चंद्र, सूर्य, मर्सिडीज गाडी असते. तिथं लोकं फोटो काढतात. चंद्रावरचा फोटो, सूर्यावरचा फोटो मर्सिडीज गाडीवरचा फोटो काढतात. हे बोगस बियाणे नाही. हे बाळासाहेब ठाकरे यांनी टाकलेल्या बियाण्यांचे पीक आहे. हे अब्दुल सत्तार यांचे बोगस बियाणे नाही. हिंदू ह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पेरलेल्या बियाण्यांच्या या ठिणग्या आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. खरी शिवसेना एकच आहे.
सध्या दिल्लीतून बरेच मोठे नेते मुंबईत येतात. अमित शाह येतात. जेपी नड्डा येतात. एकच म्हणतात. मुंबई का कब्जा लेंगे. पण एक लक्षात ठेवा, आमचा बाप, या महाराष्ट्राचा बाप, या हिंदुत्वाचा बाप एकच. (Mumbai News) बाबाचा बाप आमच्या पाठीशी आहे. तोपर्यंत आमची शिवसेना कुणाला चोरता येणार नाही. मुंबईचा कब्जा घेणे तुमच्या बापाचे आहे का, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : ठाकरे गटाच्या आणखी एका साथीदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र!
Mumbai News : आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश; विदर्भाच्या हितासाठी काम करणार!