Mumbai News : मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. जे घडलंय त्यामुळे पवार कुटुंबात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचे बोट धरुन सुप्रिया सुळे आणि अजित पवार राजकारणात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, पक्षबांधणीत या दोन्ही भावंडांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांमधील जिव्हाळ्याची नेहमीच चर्चा होत असते. पवार कुटुंब प्रत्येक सणाला एकत्र जमतात. कुटुंबियांचा एकमेकांवर जीव आहे. असे असताना अजित पवार यांनी घेतलेला राजकीय निर्णय हा पवार कुटुंबियांसाठी धक्का देणारा ठरल्याचे चित्र आहे.
अजित पवार यांचा राजकीय निर्णय पवार कुटुंबियांसाठी धक्का देणारा
सुप्रिया सुळे यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात नुकतीच एक मुलाखत दिली. या वेळी त्यांना अजित पवार यांच्यासोबत भाऊबीज साजरा करतानाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. (Mumbai News ) हा फोटो पाहून सुप्रिया सुळे भावूक झाल्या, त्यांना रडू कोसळले.
दरम्यान, या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया यांनी ‘नाही’ असे उत्तर देत सांगितले की, पक्ष फुटलेला नाही. या पक्षाचे देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. (Mumbai News ) त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस पाठवली आहे. आम्ही उत्तराची वाट पाहत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News :’जागर पदयात्रा संयमाने काढली हा इशारा, नाहीतर…’; अमित ठाकरे आक्रमक