Mumbai News : मुंबई : शिंदे सरकार पुढील दोन महिन्यांत अंतर्विरोधाने पडणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्या आधारे दोन महिन्यांत हे सरकार जाईल, असा दावा माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात १०५ आमदार असलेला फडणवीस गट आणि ४० आमदार असलेला शिंदे गट यांच्यात प्रॉक्सी वॉर अर्थात छुपे युद्ध सुरू आहे. हे सरकार कोसळेपर्यंत प्रॉक्सी वॉर सुरूच राहील, असेही राऊत यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. (Shinde government to fall in next two months; Excitement due to Sanjay Raut’s new claim)
ते बाळासाहेबांचा, आनंद दिघे यांचा साधा उल्लेख करायलाही कसे विसरू शकतात?
दरम्यान, राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या जाहिरातीचा दाखला देत संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाने सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला आहे. (Mumbai News) जाहिरातीत चित्र स्पष्ट असलं तरी सर्व काही अलबेल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मात्र स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसारच निर्णय द्यावा लागेल. हे सरकार अपात्र ठरेल आणि हे सरकार दोन महिन्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गट स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणवतो. मग काल प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये ते बाळासाहेबांचा, आनंद दिघे यांचा साधा उल्लेख करायलाही कसे विसरू शकतात? काल भाजपने विशेषत: फडणवीस यांनी नाराजी दर्शविल्यामुळे आजच्या जाहिरातीत त्यांचे छायाचित्र झळकलेले दिसते. (Mumbai News) पण पडद्यामागे काय घडलं हे मला माहीत आहे. जो बुंद से गयी वो हौदसे नही आती.
भाजपचे अंतरंग काल स्पष्ट झालं. त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाहीत, आनंद दिघेही नाही. फडणवीसही नाहीत. काल फडणवीस यांनी बांबू दिल्याने जाहिरातीत चित्र बदललं, असं ते म्हणाले.(Mumbai News) हितचिंतक अशी जाहिरात देत नाही. शत्रू देतो. हितचिंतक जपून जाहिरात देतो. बाळासाहेब ठाकरे यांना विसरले असा हितचिंतक तुमच्याकडे आहेच क? जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून बोला, असं राऊत यांनी सुनावलं.
मिंधे गटाचे मंत्री हे वरवरचा आव आणत आहेत. चेहऱ्यावर हास्य आणत आहेत. हे उसनं अवसान आहे. भविष्यात काय होईल त्यांना माहीत आहे. मुख्यमंत्री गुलमर्गमध्ये होते. हॉटेल खैबरमध्ये. त्यांना कोण भेटलं, कोणते अधिकारी होते, काय चर्चा झाल्या, भविष्यात मी उघड करेन, असा इशारा राऊत यांनी दिला.