Mumbai News : मुंबई : शरद पवारांना राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती. लोकांनी सातत्याने भाजपाचा आग्रह धरला होता, त्यामुळे शरद पवार दुखावले गेले होते. त्या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला. शरद पवारांच्या या निर्णयाला अजित पवार वगळता पक्षातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. परिणामी तीन दिवसांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि पडद्यामागून राष्ट्रवादीसोबत युतीची चर्चा करायची ही भाजपाची भ्र्ष्ट नीती आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांना राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती हेच वास्तव आहे. महाराष्ट्राची जनता, कार्यकर्त्यांचा आग्रह पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असाच होता. (Mumbai News) त्यावेळी या व्यासपीठावर समिती नको, तुम्हालाच अध्यक्षपद स्वीकारावे लागेल असे भुजबळ म्हणाले होते. पवार हुकुमशाह असते तर त्यांनी थेट राजीनामा देत ही व्यक्ती अध्यक्ष होईल, असा आदेश दिला असता.
माझ्या विचारधारेशी, वडिलांशी आणि तत्वाशी मी ठाम राहिले
खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्ष करायचं आणि मग आपण भाजपाबरोबर जायचं, हे शरद पवारांचे राजकारण असल्याचा दावा भुजबळ यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार आजपर्यंत विचारधारेनुसार वागले. राष्ट्रवादीची वैचारिक भूमिका यशवंतराव चव्हाणांची आहे. त्यामुळे शरद पवारांची भाजपासोबत जाण्याची इच्छा नव्हती.(Mumbai News) मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. परंतु भाजपासोबत जाणे मलाही न पटणारे होते. काहींना मी अध्यक्ष झाल्यावर भाजपासोबत जाण्याचा निर्णय निश्चित करायचा होता. पण ते अशक्य होते. मला तडजोड करणे शक्य नव्हते. हे मला अस्वस्थ करणारे होते. एकाबाजूला सत्ता आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग स्वीकारला. भुजबळ जे म्हणाले ते खरे आहे. पण माझ्या विचारधारेशी, वडिलांशी आणि तत्वाशी मी ठाम राहिले, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले…
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा वाढतोय कल; 26 टक्क्यांनी वाढली डिमॅट खाती
Mumbai News : बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे ‘एक पाऊल पुढे…